शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात सध्या वधू-वर घेताहेत चोर पावलांनी सात जन्माचे फेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:14 IST

आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.

ठळक मुद्देआमच्या लग्नाला यायचं नाही हं.....,: वधू-वर पित्यांची आतेष्टांना विनंती

महेंद्र पगारे ।कुकाणे : आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.सध्या कोरोनाच्या संकटात फिजिकल डिस्टन्सिंंगच्या भीतीने वर आणि वधूकडील मंडळीना ‘सावधान’ राहून कसेतरी उरकून घ्यायचे पडलेले असते. अगदी कमी लोकात हा विधी लवकरात लवकर कसा उरकेल, याबद्दल दोन्हीकडील मंडळी मूक होकार देत जमेल त्या परिस्थितीत ‘कबूल है’ म्हणत लग्न आटोपतात. लग्नात अगोदर निमंत्रण पत्रिका वाटणे, तेही थेट घरी जाऊन. मग तो नातेवाईक कितीही किलोमीटर दूर असला थेट त्याच्या घरी नेऊनच पत्रिका द्यावी लागते. अन्यथा तो रुसण्याचा धोका जास्त असतो. यानंतर मग सुरू होतात ते अनेक सोहळे. आयाबायांचा मानपान, पाय धुणे, वर ओवाळणी, कानपिळणी, रुखवत अशा एक ना अनेक सोपस्कारांतून जावे लागते. हे करता करता मात्र सर्वांच्याच नाकीनव येते. वधू आणि वर पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जास्त गर्दी कोण जमवतो? कारण त्यातच खरा ‘रुबाब’ आणि ‘प्रतिष्ठा’ असते. लग्न- सोहळ्याला गर्दी जमा होते आणि मग वर व वधू पक्षाकडील मंडळीच्या जिवात जीव येतो. नंतर आयुष्यभर त्या लग्नाच्या गर्दीचा तोरा मिरवला जातो. मात्र, आता या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जातो आहे.इच्छा असूनही आतेष्टांना दूरच ठेवावे लागत आहे, मात्र आतेष्टांकडून दिलगिरीही व्यक्त केली जात आहे, परंतु नातेवाईकही आता प्रेम आणि युद्धात जसे सर्व काही माफ असते तसेच अशा छोटेखानी लग्नातही सर्व काही माफ अशा भूमिकेत येऊन राग-लोभ विसरून मुकाट्याने या सोहळ्यात आॅनलाइनच सामील व्हावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न