शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘स्वच्छ शहर’ प्रतिसादासाठी महापालिकेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:05 IST

शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे.

नाशिक : शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे. मालेगावमध्ये नऊशेहून अधिक नागरिकांनी प्रतिसादासाठी कॉल केले असताना नाशिकमध्ये मात्र अवघे साडेसहाशेच नागरिक जागरूक ठरले आहेत. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छ शहरासाठी केंद्र शासनाकडे प्रतिसाद नोंदविला आहे.केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहरांसाठी अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत देशभरातील शहरात स्पर्धा घेतली जाते. शहरात अस्वच्छतेची ठिकाणे कमीत कमी व्हावा, घनकचरा व्यवस्थापनाचा अधिकाधिक वापर व्हावा, सार्वजनिक शौचालये स्वच्छ असावीत तसेच त्याचप्रमाणे घरगुती कचऱ्याचेदेखील वर्गीकरण व्हावे हा या मागील शासनाचा उद्देश असतो. महापालिका त्यादृष्टीने प्रयत्न करीत असतात. परंतु तरीही याबाबत स्थानिक नागरिकांना कितपत माहिती आहे, तसेच त्यांचे स्वच्छतेबाबत ज्ञान किती याचादेखील आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने नागरिकांचा प्रतिसाद घेतला जातो.यासंदर्भात प्रत्यक्ष पथक शहरात दाखल झाल्यानंतर ते तर नागरिकांशी चर्चा करतेच, परंतु १९६९ हा टोल फ्री क्रमांक असून, त्यातूनही नागरिकांनी फोन करून प्रतिसाद नोंदवायचा असतो. परतुं त्यात नाशिक शहरातील नागरिक कमी पडत आहेत. मालेगाव येथील नागरिकांनी केलेले कॉल हे नऊशेहून अधिक आहेत. मात्र, नाशिक महापालिकेसंदर्भातील केवळ साडेसहाशे कॉल्सच झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी असा द्यावा प्रतिसादमहापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भात प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी १०६९ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तो फोन कट होतो आणि त्यांनतर पुन्हा कॉल येतो, त्यावर विचारण्यात येणाºया प्रश्नांसाठी पर्याय दिला जातो व त्यानुसार प्रतिसाद दिल्यानंतर नोंद केली जाते. फोन करणाºया व्यक्तीची व्यक्तिगत माहिती घेऊन ती संकलित केली जाते. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.प्रतिसाद कमीच  त्रास अधिकमहापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी प्रयत्न केले जात असून, विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुलभ शौचालयत आरसे, पेपर नॅपकीनदेखील ठेवण्यात आले आहेत. मात्र तेदेखील चोरीस जात असल्याने महापालिकेची अडचण अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान