मनमाड : पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाला अज्ञात चोरट्यांनी चाकुचा धाक दाखउन सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. दरम्यान धावत्या गाडीतील वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशी वर्गाची सुरक्षीतता धोक्यात आली आहे.मनमाड येथील येवला रोडवरील कॅँप नं २ मधील रहिवाशी असलेल्या राहूल अंबादास साबळे यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना चाकुचा धाक दाखऊन २० ग्रॅम सोन्याची चैन , सॅमसंग कंपनीचा मोबाई, रोख ४३०० रुपये रोख असा एकूण १ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उ.नि. सोनवणे हे करत आहे. (वार्ताहर)
धावत्या रेल्वेत सव्वा लाखांची लूट
By admin | Updated: October 12, 2015 23:38 IST