शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाहनांच्या शोधासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:10 IST

मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील भगवती बिल्डिंग सप्लायर्स यांचा रेतीघाट निलंबित करण्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

मालेगाव : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील भगवती बिल्डिंग सप्लायर्स यांचा रेतीघाट निलंबित करण्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.सोमवारी मध्यरात्री ४४ लाख ६५ हजार ५२५ रुपये महसूल बुडवून वाळूमाफियांनी तहसील आवारातून ट्रक पळवून नेले आहेत. या प्रकाराची अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांना दहाही वाहनांचा शोध घेऊन महसूल विभागाकडे जमा करण्याचे पत्र देण्यात आले आहे.  पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. राज्यभरातील टोलनाके व उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना ट्रकचे क्रमांक देण्यात आले आहेत. पोलिसांनी पळवून नेलेल्या या ट्रक्सचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना आव्हान देण्याचा प्रकार वाळूमाफियांकडून केला गेला आहे. तसेच महसूल विभागाच्या  काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे ट्रक पळविण्याचा प्रकार घडला असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.राजकीय वरदहस्तामुळे मुजोरीजळगाव येथील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर अध्यक्षाने अपर जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेऊन ट्रक सोडून देण्यासाठी दबाव आणला होता. राऊत यांनी दंडाची रक्कम भरून ट्रक घेऊन जा, असे सांगितले. यावर संताप व्यक्त करीत राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाने धमकी देत कार्यालयाबाहेर पडले होते. याबाबतचा पत्रव्यवहारही अपर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला आहे.तहसीलदारांकडून मागविला खुलासावाळूमाफियांनी दंड न भरता तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्यानंतर अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून, त्या पत्रात चौकीदार कोण होते? तहसील कार्यालयाचे दोन्ही गेट कुलूप बंद होते मग कुलूप कोणी उघडले. नियुक्त असलेल्या चौकीदाराने तुम्हाला कधी कळविले ? ट्रक तहसील आवारातून पळवून कोणी नेल्या याबाबत खुलासा करण्याचे म्हटले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय