शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:07 IST

प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी करदात्यांची अखेरच्या दिवशीही सोमवारी (दि.३१) धावाधाव सुरू होती. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना मोठ्या गर्दीपासून दिलासा मिळाला आहे

नाशिक : प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी करदात्यांची अखेरच्या दिवशीही सोमवारी (दि.३१) धावाधाव सुरू होती. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना मोठ्या गर्दीपासून दिलासा मिळाला आहे. सुमारे ८० टक्के करदात्यांनी कर सल्लागार अथवा सनदी लेखापालांच्या मदतीनेच रिटर्न्स भरले असून, नोटाबंदीनंतर करदात्यांमध्ये रिटर्न भरण्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे मत आयकर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. छोटे व्यावसायिक, नोकरदार आणि एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाºयांनी ३१ जुलैपर्यंत रिटर्न्स भरणे आवश्यक होते. ई-फाइलिंग व प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्याविषयी नोटाबंदीच्या काळानंतर सर्वसामान्य करदात्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक करदात्यांनी रिटर्न्स भरले. रिटर्न भरण्याची मुदत संपली असली तरी करदाते ३१ मार्चपर्यंत त्यांचे विवरणपत्र सादर करू शकणार आहेत. परंतु, यापुढील काळात करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा १ टक्का व्याज दंडात्मक स्वरूपातच मोजावे लागणार असल्याने शासकीय व खासगी क्षेत्रांतील अनेक वेतनधारकांसह छोटे व्यावसायिक आणि एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाºयांनी ३१ प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा प्रयत्न केल्याने नेहमीच्या तुलनेत मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी करदात्यांनी विवरणपत्र सादरकरण्यासाठी घाई केल्याचे दिसून आले. ई-फाइलिंगमुळे करदात्यांची मोठी समस्या सुटली आहे. रिटर्न्स भरण्याची प्रक्रि या सुलभ झाल्याने करदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आॅनलाइन रिटर्न्स भरणाºयांची संख्या वाढल्याने सर्व्हर डाउन होत असल्याचा अनुभव काही करदात्यांना आला. तसेच मोबाइल क्र मांक आणि ईमेल आयडीच्या बाबतीत करदात्यांना अनेकविध अडचणी आल्याने या दोन्ही बाबींसाठी पर्याय असणे गरजेचे असल्याचे मत करदात्यांनी व्यक्त केली आहे.करदात्यांना दिलासाप्राप्तीकर विवरण भरण्याची सोमवारी (दि.३१) अंतिम मुदत असल्याने देशभरातून अनेक करदात्यांनी एकाचवेळी आॅनलाइन प्राप्तीकर विवरण भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे करदात्यांना सर्व्हर डाउनचा सामना करावा लागल्याने त्यांनी सोशल मीडियातून रोष व्यक्त केला. अनेक करदात्यांना त्यांचे विवरणपत्र दुपारपर्यंत सादर करता आले नाही. त्यामुळे रिटर्न्स भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणीने अधिक जोर धरल्याने अखेर प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असून प्रामाणिकपणे आयकर भरणाºया करदात्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.दंड भरावा लागणारप्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदत संपली असली तरी जे करदाते रिटर्न्स दाखल करू शकले नाही, त्यांना ३१ मार्चपर्यंत रिटर्न्स दाखल करता येऊ शकतो. त्यासाठी कराच्या रकमेवर अतिरिक्त १ टक्का व्याजही करदात्यांना दंडात्मक स्वरूपात भरावे लागणार आहे. करदात्यांना अशी सवलत चालू आर्थिक वर्षासाठीच लागू असणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून मुदत संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत निर्धारित व्याज व अतिरिक्त पाच हजार रुपये दंड, तर ३१ मार्चपर्यंत व्याजासह दहा हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे.- तुषार पगार, सनदी लेखापाल, नाशिक