शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

प्रशासनाची धावपळ : ग्रामपंचायतीची विहीर उपसली

By admin | Updated: April 2, 2015 00:25 IST

भालूरला विषारी पाणीपुरवठ्याची अफवा

मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत थायमेट हे विषारी औषध टाकले असल्याची अफवा मंगळवारी गावात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तत्काळ पाण्याच्या प्राथमिक तपासाअंती असा प्रकार नसल्याचा अंदाज व्यक्त केला, तर खबरदारीचा उपाय म्हणून या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून टाकण्यात आले आहे. संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या या घटनेच्या अफवेचा जन्मदाता कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गावाच्या पश्चिम शिवारात असलेल्या बंंधाऱ्याखालील ग्रामपंचायतच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. या विहिरीजवळ काही महिलांचे भांडण झाल्याने रागाच्या भरात विहिरीत थायमेट हे विषारी द्रव्य टाकले असल्याची चर्चा गावात पोहचली. मंगळवारी (दि. ३१) पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर सर्वत्र पसरलेल्या या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. बुधवारी (दि. १) ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी गावात फिरून घरोघरी सोडलेले पाणी पिण्यासाठी वापरू नका, अशा सूचना केल्या. याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले. सरपंच वामन पवार, आरोग्यसेवक आर. के. कराड व ग्रामस्थांनी विहिरीवर जाऊन पाहणी केली. प्राथमिक तपासाअंती पाण्यात विषबाधा नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. असे असले तरी खबरदारीची उपाय योजना म्हणून विहिरीतील संपूर्ण पाणीसाठा उपसून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिवसभर विद्युतपंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसून विहीर कोरडी करण्यात येऊन परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई निर्माण झालेली असताना घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करावा लागला. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत चौकशी करून अफवा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाही, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)