शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘रन फॉर फन’

By admin | Updated: April 13, 2015 01:31 IST

‘रन फॉर फन’

नाशिक : ‘हवाओ से कहें दो, हमे कम ना समझे, हम कदमो से नहीं, हौसलो से उडा करते हैं’ अशा स्फूर्तीदायक शायरीने प्रोत्साहित होत ‘रन फॉर फन’ या स्पर्धेत तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयानेही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निमित्त होते, देवळाली येथील तोफखाना केंद्रामधील फिल्ड रेजिमेंटच्या फुटबॉल मैदानावर आयोजित ‘रन फॉर फन’ स्पर्धेचे. बुधवारी (दि.१५) तोफखाना केंद्राचा ७४वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने तोफखाना केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बारा वर्षांपर्यंतची मुले (तीन कि.मी.), तरुण-तरुणी, महिला, पुरुष अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारीवर्ग या गटांमध्ये (पाच कि.मी.) पार पडली. तोफखाना केंद्राचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थित हवेत फुगे सोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, उगवत्या दिनकराच्या साक्षीने बालगोपाळांनी तीन किलोमीटरचे लक्ष्य गाठण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर तरुण-तरुणींसह महिलांनी धाव घेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अखेरच्या टप्प्यात पुरुष अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी पाच किलोमीटरच्या शर्यतीसाठी धावले. या स्पर्धेत लहान गटात संदीप चव्हाण, अमिश या मुलांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. अठरा वर्ष वयोगटात रोहित नायर (प्रथम), सौरभकुमार सिंग (द्वितीय), प्रयश राठी (तृतीय) हे विजयी झाले. तसेच अधिकारी वर्गाच्या गटात लेफ्टनंट रोहितकुमार झा, लेफ्टनंट मनोजकुमार, लेफ्टनंट विकास कमल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आणि महिलांच्या गटात अमिता सिंग, देवरानी सिंग, प्रियंका सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सूत्रसंचालन लेफ्ट. कर्नल अभिषेकसिंग गौतम व स्मृती शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)