शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल व्हिडिओवरून स्टंटबाजांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:31 IST

रेल्वे पोलिसांची कारवाई : मनमाडचे दोघे तरुण ताब्यात

ठळक मुद्देया स्टंटबाजीचा उपद्रव पुलावरून ये-जा करणा-या प्रवाशांना सहन करावा लागला. संबंधित स्टंटबाजांनी सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा प्रकार चांगलाच चर्चेत आला.

मनमाड : रेल्वेसह स्थानकांमध्ये जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरांचे व्हिडिओ अनेकदा मोबाईलवर व्हायरल होतात आणि ते मोठ्या प्रमाणावर पाहिलेही जातात. व्हायरल व्हिडिओचा पोलिस यंत्रणेकडून गांभीर्याने तपास होतोच असे नाही. परंतु, मनमाड पोलिसांनी मात्र, अशाच एका व्हायरल व्हिडिओवरुन संबंधित स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील रेल्वेस्थानकावर नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् त्यावर असंख्य लाईकचा वर्षाव देखील झाला. मात्र हाच व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य करत त्या टवाळखोर तरु णांच्या मुसक्या आवळल्या आहेत.नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी मनमाड रेल्वे स्थाननकावर नव्याने पादचारी पुल उभारण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये यासाठी पुलावर चढण्यासाठी पायºयांऐवजी उतरता रॅम्प तयार करण्यात आला आहे. या रॅम्प चा वापर करून टवाळखोर तरूणांनी या पादचारी पुलाचा वापर स्टंटबाजी करण्यासाठी केला. विशेष म्हणजे स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर देखील व्हायरल केला. या स्टंटबाजीचा उपद्रव पुलावरून ये-जा करणा-या प्रवाशांना सहन करावा लागला. संबंधित स्टंटबाजांनी सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा प्रकार चांगलाच चर्चेत आला. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. स्टंटबाजी करणा-या तरुणांचा पोलिस व आरपीएफकडून कसून शोध घेण्यात आला. अखेर रेल्वे स्थानकाच्या नवीन पादचारी पुलावर स्टंटबाजी करणा-या दोघा तरु णांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.प्रत्येकी दीड हजाराचा दंडपोलिसांनी व्हिडिओची गंभीर दखल शोधकार्य आरंभले आणि इम्रान जाकीर शेख व शुभम सूर्यकांत पोंगालू (राहणार मनमाड) अशी या तरुणांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दीड हजार रु पयांचा दंड केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocial Viralसोशल व्हायरल