शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कलापुष्प’मध्ये रमले चिमुकले कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:29 IST

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मनमाड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मविप्रचे तालुका संचालक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजºया करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जगन्नाथ धात्रक, शिक्षण मंडळ केंद्र समन्वयक सूर्यभान नाईकवाडे, प्राचार्य एस.एन. तावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक पंकज गांगुर्डे यांनी प्रास्ताविकामधून शाळेच्या कार्याचा आढावा सादर केला. आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असून, सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव मिळणे आवश्यक असल्याचे मत दिलीप पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. हरिपाठ, दिंडी, देवीचा गोंधळ, खंडोबाची जेजुरी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. मोबाइलच्या अति वापराबाबत जनजागृती करणारे नाट्य साकारण्यात आले. शाळेत वर्षभरात होणारे विविध उपक्रम, साजरे करण्यात येणारे सण-समारंभ याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल अहेर, रुपाली शेलार, सचिन पवार, दिवटे, चोळके यांच्यासह अन्य शिक्षकांनी परिश्रम घेतले. पूनम मढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भामरे व ज्ञानेश्वर पगार यांनी केले.नगराध्यक्षांनाही झाला गीतगायनाचा मोह......मनमाड येथील अभिनव बाल विकास मंदिर शाळेच्या चिमुकल्यांचा कलापुष्पमधील उत्साह पाहून स्रेहसंमेलनाच्या उद्घाटक नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनाही गीतगायनाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘गरजा महाराष्टÑ माझा’ यासह तीन गीते गाऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली. यामुळे बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला असल्याचे मुख्याध्यापक पंकज गांगुर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक