नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदी आणि लक्ष्मीपूजनासाठी एटीएममधून रक्कम काढण्यावर भर दिल्याने विविध बँकांच्याएटीएममध्ये गुरूवारी (दि. २) खडखडाट दिसून आला. ऐन दिवाळीत नागरिकांना एटीएममधून रोख रक्कम मिळण्यात अडचणी येत असताना अनेक ग्राहकांनी विविध मोबाईल ॲपच्या मदतीने डिजिटल पेमेंट करून खरेदीचा आनंद लुटला. मात्र, लक्ष्मीपूजनासाठी रोकड हातात उपलब्ध होऊ न शकल्याने काहींना नाराज व्हावे लागले. काही जणांनी दुकानदार, पेट्रोलपंप अशा ओळखीच्या ठिकाणांहून रोख रकमेचे पूजेसाठी नियोजन केले. तर अनेकांनी दिवाळीपूर्वीच नव्या कोऱ्या नोटांचे बंडल लक्ष्मी पूजनासाठी घरी आणून ठेवल्याचे दिसून आले.
एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2021 00:24 IST