शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारातील घटक पक्षही भाजपाला दणका देणार

By admin | Updated: February 8, 2017 22:06 IST

वीस उमेदवार घोषीत: अन्य ठिकाणी पुरस्कृत करणार

नाशिक : राज्यात भाजपाबरोबर सत्तेत असूनही महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा वाटा न मिळाल्याने छोटे पक्ष नाराज आहेत. त्यांनी कुवतीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु त्याही पलीकडे जाऊन आता भाजपाला देणका देण्याची तयारी सुरू असून, विरोधकांना पुरस्कृत करण्याची तयारी सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ही माहिती दिली.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत युती आघाडीचे दिवस सुरू झाल्यानंतर राज्यात भाजपाबरोबरच सत्तेत असलेल्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन आघाडी केली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं आणि रासपाचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय संभाजी ब्रिगेडसह अन्य काही पक्षही सहभागी होते. भाजपाने महापालिका निवडणुकीत काही जागा घटक पक्षांना मिळाव्या अन्यथा स्वबळावर लढवू, असा इशारा त्यांनी दिला होता. परंतु नाशिक भाजपात प्रथमच इच्छुकांची संख्या वाढल्याने या पक्षाने छोट्या मित्र पक्षांशी चर्चा करू करू म्हणत म्हणत अखेरपर्यंत झुलवले. छोट्या पक्षांची नाशिकमध्ये पुरेशी ताकद नाही, परंतु तरीही चर्चा करू असे सांगत भाजपाच्या नेत्यांनी टाळाटाळ केल्याने अखेरपर्यंत या पक्षांना युतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे छोट्या पक्षांनी एकूण २० उमेदवार उभे केल्याचे हंसराज वडघुले यांनी सांगितले.विशेष म्हणजे आता भाजपाच्या विरोधात या पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजपा विरुद्ध मतदारात नाराजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पातही भाजपाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केलेला दिसत नाही, अशा स्थितीत भाजपाला धक्का देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घटक पक्षांचे उमेदवार नाही, अशा ठिकाणी भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना त्यातही बहुतांशी शिवसेनेला समर्थन देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा उत्साहात असलेल्या भाजपाला निवडणुकीत भाजपा विरुद्ध सर्व अशा पद्धतीने संघर्ष करावा लागणार आहे.