विरोधी पॅनलमध्ये सत्ताधारी; तीन पॅनलची निर्मिती

By Admin | Published: July 8, 2014 11:18 PM2014-07-08T23:18:21+5:302014-07-09T00:54:49+5:30

विरोधी पॅनलमध्ये सत्ताधारी; तीन पॅनलची निर्मिती

Ruling in opposition panel; The three panels are produced | विरोधी पॅनलमध्ये सत्ताधारी; तीन पॅनलची निर्मिती

विरोधी पॅनलमध्ये सत्ताधारी; तीन पॅनलची निर्मिती

googlenewsNext

 नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४४२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २९ जागांसाठी ८६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गिते, सिन्नर पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांनी माघार घेतली आहे. सत्ताधारी पॅनलच्या वतीने माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली श्री विजय पॅनलची निर्मिती करण्यात आली, तर विरोधी गटाच्या वतीने प्रल्हाद पाटील-कराड, एन. एम. आव्हाड, डॉ. डी. एल. कराड व विद्यमान सरचिटणीस कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्यात आली. अ‍ॅड. एस. टी. सानप व मनोज बुरकुले यांनी लोकनेते पॅनलची निर्मिती केली. (प्रतिनिधी)

Web Title: Ruling in opposition panel; The three panels are produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.