शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा धुडगूस; चारचाकी वाहनाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:47 IST

लासलगाव : बंदोबस्त करण्याची मागणी

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात फळांचे व्यापारी असलेल्या शौकत शेख यांचा मोकाट जनावरांच्या धडकेत मृत्यू झाला होता.

लासलगाव : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून मध्यंतरी मोकाट जनावरांच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्र वारी (दि.८) मोकाट जनावरांनी धुडगूस घातल्याने चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बसलेली पाहायला मिळतात. अनेक वेळा या मोकाट जनावरांच्या मारामाऱ्या भर रस्त्यात सुरू असतात. या मारामारीत अनेक वाहनांचे नुकसान यापूर्वी झालेले आहे. मोकाट जनावरांची संख्या मोठी असल्याने परिसरात मोकाट जनावरांमुळे भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात फळांचे व्यापारी असलेल्या शौकत शेख यांचा मोकाट जनावरांच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्र वारी विद्यानगर येथील सरस्वती शाळेसमोर मोकाट जनावरांची मारामारी सुरू असताना अमोल गायकर यांची मारु ती सियाज गाडी दूरवर उभी करण्यात आली होती मात्र मोकाट जनावरांनी त्या गाडीच्या दिशेने पळत येऊन जोरात धडक दिल्याने त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोकाट जनावरांची लासलगाव शहरात दहशत निर्माण होत असून या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक