शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची दुसरी राज्यस्तरीय सोडत जाहीर ; पालकांना सोमवारी मिळणार एसएमस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:04 IST

आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रवेशाची दुसरी राज्यस्तरीय सोडत जाहीरसोमवारपासून एसएमएसद्वारे मिळणार माहिती

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत जिल्ह्यातील तीन हजार ५१७ विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. मात्र पहिल्या फे रीअंती केवळ दोन हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित तीन हजार २५१ जागांसाठी तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दुसरी सोडत काढण्यात आली. या सोडतीचा तपशील सोमवारी जाहीर केला जाणार आहे. अशाप्रकारे सोडत जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा तपशील जाहीर करूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेत खोटे पत्ते, एकच विद्यार्थ्याच्या नावाचे व पत्त्याचे दोन वेगवेगळ्या जन्मतारखांचे अर्ज सोडतीत निवडले गेले होते. विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेशही झाले आहेत. त्यामुळे अशाप्रक ारे सोडत जाहीर करण्याच्या प्रक्रियेविषयी पालकांमधून साशंकता व्यक्त होत असताना दुसरी सोडतही याचपद्धतीने काढण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचे पालक  या सोडतीच्या प्रतीक्षेत होते.  त्यांची प्रतीक्षा संपली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या फेरीत २ हजार ४८४ जागांवर प्रवेश झाले असून, उर्वरित तीन हजार ५१७ जागांवर दुसºया फेरीत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.  आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर काढण्यात येणारी सोडत या वर्षापासून राज्यस्तरावर काढण्यात येत आहे. तसेच मागील वर्षी सात सोडतींमध्ये झालेली ही प्रक्रिया यंदा चार सोडतींमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, दुसरी सोडत जाहीर होण्यातच अर्धा जून उलटल्याने आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण कधी होणार? असा सवाल उपस्थित करतानाच किमान दुसरी फेरी कोणत्याही गोंधळाशिवाय लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा प्रतीक्षेत असलेल्या पालकांकडून व्यक्त होत आहे.