शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस जनकल्याण समितीचे ‘कोविड झिरो’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:16 IST

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून शहरात प्रशासनाच्या ...

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून शहरात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत ‘मिशन झिरो कोविड’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.नाशिकमधील कोविडबाधितांची वाढ रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रिनिंग करून संशयित रु ग्ण शोधून काढणे आवश्यक आहे. म्हणून कंटेन्मेंट परिसरातील व्यक्तींचे टेंपरेचर घेणे, आॅक्सिजन पातळी तपासणे, शंका आल्यास तिथेच स्वॅब घेणे, गरज वाटल्यास त्वरित पेशंटला हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करणे याप्रकारे काम कण्यात येणार आहे. या उपक्रमाला प्रारंभिक टप्प्यात शनिवार (दि. २५) आणि रविवार (दि.२६) असे दोन दिवस चालेल. देशाच्या अनेक शहरातील संघ स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासनासोबत स्क्रिनिंग कामात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे नाशकातही प्रशासनाचे सोबत मिशन झिरो कोविड उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संघ कार्यकर्ते तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक कोरोनामुक्त करण्याचा निर्धार आरएसएस जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.सहभागी होणा-या प्रत्येक स्वयंसेवकाला पीपीई किट घालून स्क्रिनिंगसाठी कंटेन्मेंट क्षेत्रात जावे लागणार आहे. त्या पथकात एका तज्ज्ञासह अन्य दोन स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे. दररोज किमान सहा तास काम करावे लागणार आहे. तसेच माता-भगिनींचे स्क्रिनिंग सुलभपणे करता यावे यासाठी ज्या महिला, युवती या मोहिमेत स्वयंसेवक सहभागी होतील, त्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक