शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्टअप’साठी राज्यात २५० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:28 IST

उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने विनजितच्या मुख्य फिनटेक अधिकारी सुनीती नंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातपूर : उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने विनजितच्या मुख्य फिनटेक अधिकारी सुनीती नंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील विनजित कंपनीत आलेल्या फिनटेक यात्रेबाबत नंदा यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या माध्यमातून ‘स्टार्टअप’ प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिनटेक यात्रेद्वारे देशभरातील १६ राज्यामधील ५०० युवकांच्या भेटी घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जागा, मनुष्यबळ, उत्पादन व ग्राहक या सर्वांच्या उपलब्धते सोबतच पुढील तीन वर्षांत २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टार्टअप रजिस्ट्रेशन सूरू करण्यात आले असून, त्यात ७० स्टार्टअपची नोंदणी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी फिनटेकचे संचालक अभिशांत पंत यात्रेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी स्टार्टअपसाठी अत्यावश्यक धोरणांत भांडवल, ग्राहक व त्यासाठीची इको सिस्टीम गरजेची असल्याचे सांगितले. दिवसभरात नाशिक परिसरातील आठ स्टार्टअपला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.फिनटेक रॅली मुंबई, पुणे, हैद्रराबाद, बंगळूरू, कोचीन, चेन्नई, विझाग, भुवनेश्वर, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, चंदीगड, जंयपूर, अहमदाबाद, नाशिक व मुंबई येथे समाप्त करण्यात येणार आहे. यावेळी विनजितचे संचालक अश्विन कंदोई, अभिजीत जुनागडे डॉ.सचिन पाचोरकर आदी उपस्थित होते.यात्रा विनजित सॉफ्टवेअरमध्येपुढील महिन्यात नव्याने नोंदणी सुरू करण्यात येणार असून, आपल्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे आवाहन नंदा यांनी केले. या उपक्रमांसाठी देशभरातून ६५० ते ७०० अर्ज दाखल झाले आहेत, तर राज्यातून १७० ते १८० अर्ज दाखल झाले आहेत. त्यात ८ ते ९ अर्ज नाशिक विभागातून आहेत. ही यात्रा देशभरातील साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून परतीच्या प्रवासात नाशिकला ‘विनजित’ सॉफ्टवेअरमध्ये दाखल झाली.

टॅग्स :MIDCएमआयडीसी