नाशिक : स्ािंहस्थ शाही मार्गावरील अडथळे दूर करून निर्धोक करण्याच्या सूचना अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी प्रशासनाला पाहणी दौरा दरम्यान दिल्या.महंत ग्यानदास यांनी शाही मार्गाची जिल्हाधिकारी दीपेंद्रस्ािंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासमवेत पाहणी केली. पंचमुखी हनुमान मंदिरापासून रामकुंडापर्यंत त्यांनी पायी चालत मार्गातील अडथळे काढून टाकण्याबाबत सांगितले. तसेच गणेशवाडीतील गणेशवाडी व्यायामशाळेचा पडलेला भाग पाहून ती हटविण्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले; मात्र खासगी मिळकत असल्याने काढता येत नसल्याचे यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु हटविता येत नसेल तर व्यायामशाळा दुरुस्त करण्याचे महंतांनी सुचविले. शाही मार्गावरील केबल, तारांचे अडथळे दूर करण्यात यावे. गंगाघाटाजवळील गाडगे महाराज पुलाखालून २५ फुटाचा ध्वज जाण्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. ध्वजाच्या उंचीनुसार खोल करून त्याठिकाणी पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत महापालिका आयुक्तांना सांगितले. शाही मार्गाच्या या पाहणी दौऱ्याप्रसंगी महंत रामकिशोरदास, महंत भक्तिचरणदास, महापालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुनील खुने, धनंजय बेळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शाही मार्ग निर्धोक करणार
By admin | Updated: August 1, 2015 00:35 IST