नाशिक : शहरात ऑनलाइन रौलेट जुगार पुन्हा एकदा सुरू झाला असून, अनेक नागरिक या जुगाराला बळी पडत आहेत. यामुळे गुन्हेगारीमध्येदेखील वाढ होत असून, ऑनलाइन रौलेट जुगार चालवणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, डॉ. संदीप चव्हाण, संदीप गोवर्धन, कल्पेश दांडेकर, अनिल ठाकरे, गणेश पवार यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑनलाइन रौलेट जुगारामुळे तरुण, शालेय व महविद्यालयीन विद्यार्थी व बेरोजगार ऑनलाइन रौलेट या खेळाकडे आकर्षित झाले असून, यामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
120821\12nsk_47_12082021_13.jpg
निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देतांना. अंबादास खैरे, जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर,डॉ.संदीप चव्हाण, संदीप गोवर्धन, कल्पेश दांडेकर,अनिल ठाकरे