शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

कोबीवर फिरविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:34 IST

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवित कोबीचे पीक उद्ध्वस्त केले.

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवित कोबीचे पीक उद्ध्वस्त केले.खामखेडा परिसरात दरवर्षी उन्हाळी कोबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे खामखेडा हे गाव कोबी पिकासाठी इतर राज्यात परिचित आहे. कोबीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षीही पावसाळा चांगल्या प्रमाणात झाल्याने, विहिरींनाही भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती.कोबी पीक चांगल्यापैकी तयार झाले होते. हाती चार पैसे येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु अचानक देशात कोरोना व्हायरस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने देशात सर्वत्र संचारबंदी लागू झाली. शेतातील तयार झालेला कोबी बाहेरील राज्यात नेता येत नाही किंवा बाहेरील व्यापारी खरेदीसाठी शेतात येत नसल्याने कोबीचे पीक शेतातच सडू लागल्याने शेतकरी कोबी पिकावर रोटाव्हेटर फिरविताना दिसून येत आहे. खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड करणे, मशागत, रासायनिक खत, औषधे फवारणी यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केला होता, मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यापारीही उपलब्ध नसल्याने विक्रीसही अडचणी येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या भाजीपाला बाहेर विक्रीसाठी घेऊन जाणेही अवघड आहे. ये-जा करण्यासाठीचा वाहनाचा खर्च निघणेही मुश्कील आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण असल्याने शिरोरे यांनी अखेर एक एकर क्षेत्रावरील शेतातील कोबीवर रोटाव्हेटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक