शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:08 IST

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गासह प्रहार संघटनेने प्रशासनाकडे केली होती.यावर्षी धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे भरण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मागील महिन्यात रब्बीसाठी आवर्तन दिल्याने शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना या आवर्तनाचा लाभ झाला होता. सध्या कडक उन्हाचे दिवस सुरू झाल्याने पिकांना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणीटंचाईचा फटका बसला असल्याने कालव्यास आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात पाटपाण्याच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंबबागा असून, त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. पालखेडचे पहिले आवर्तन वेळेवर सुटल्याने तसेच विहिरींना पाणी असल्याने पाण्याची समस्या जाणवली नाही, परंतु गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून बºयाच तालुक्यातील सर्वच विहिरींनी तळ गाठल्याने पिके करपण्याचा धोका निर्माण झाला. अशातच प्रशासनाच्या नेहमीच्या कारभारानुसार पाण्याचे नियोजन येत्या वीस तारखेनंतर येणार होते, परंतु प्रहार संघटनेने व शेतकरी यांनी निवेदनाद्वारे परिस्थिती समजावून सांगत आंदोलनाचा इशारा दिला. यामुळे संबंधित प्रशासनाने पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी