नाशिक : सातत्याने एकाच विभागात व त्यातल्या त्यात एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या तसेच अगदी वर्ष- दोन वर्षे या अल्प कालावधीतच विभाग ताब्यात घेतलेल्या अशा सर्वच कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांची खांदेपालट करण्याची मागणी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सामान्य प्रशासन विभागाला सर्वच कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांचे अंतर्गत बदलाचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. आता त्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळेंनीही तशीच मागणी केल्याने जिल्हा परिषदेत लवकरच अंतर्गत खांदेपालटाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षकांचे बदला विभाग
By admin | Updated: January 28, 2015 02:02 IST