शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रल्वे प्लॅटफॉर्म दोनवर शॉर्टसर्किटने लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:09 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म दोनवर रविवारी रात्री सव्वादोन वाजता शॉर्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज करत लागलेली आग काही वेळातच विझल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक बालंबाल वाचले. यामुळे प्रवासी, कामगार सर्वजण घाबरून गेले होते. रेल्वेस्थानकावर तीन दिवसांत आग लागण्याची दुसरी घटना घडली आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म दोनवर रविवारी रात्री सव्वादोन वाजता शॉर्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज करत लागलेली आग काही वेळातच विझल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक बालंबाल वाचले. यामुळे प्रवासी, कामगार सर्वजण घाबरून गेले होते. रेल्वेस्थानकावर तीन दिवसांत आग लागण्याची दुसरी घटना घडली आहे.नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रविवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास मुंबई एलटीटी-पटना राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म दोनवर काही वेळातच येत असल्याची उद्घोषणा झाली होती. नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्म एक, दोन व तीनवर प्रवासी, रेल्वे कामगार, खाद्य पदार्थ विक्रेते आदिंची गर्दी होती. यावेळी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पादचारी पुलाजवळ छताला लागून असलेल्या विद्युत वायरिंगमध्ये शार्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज होत मोठी आग लागली. ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या खालीच व आजूबाजूला प्रवासी बसलेले होते. स्फोटासारख्या झालेल्या जोरदार आवाजामुळे प्लॅटफॉर्म दोनवर प्रवासी व सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. आग लागल्यानंतर स्फोटासारखे आवाज होत असल्याने सर्वजण घाबरून गेले होते. यावेळी पार्सल विभागाचा कामगार श्याम गायकवाड व त्याचे सहकारी प्लॅटफॉर्म दोनवरून गाड्यांमध्ये सामान घेऊन जात होते. गायकवाड याने तत्काळ प्लॅटफॉर्म एक वरील उपप्रबंधकांच्या कार्यालयात धाव घेऊन अग्निरोधक सिलिंडर आणून आग आटोक्यात आणली. मात्र सिलिंडर संपल्यानंतर पुन्हा स्फोटासारखे आवाज होत आग वाढू लागली. भोसले यांच्या स्टॉलवरून आणखीन एक अग्निरोधक सिलिंडर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. श्याम याने उपप्रबंधक कार्यालयात धाव घेऊन उपप्रबंधक एस. जे. महाले यांना आग लागल्याचे सांगितले.  महाले यांनी तत्काळ वॉकीटॉकीवरून मुंबईकडून येणारी राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसच्या चालकाला आग लागल्याचे सांगून रेल्वे थांबविण्याची किंवा गती कमी करण्याची सूचना केली. त्यानुसार प्लॅटफॉर्म दोनच्या प्रारंभीच रेल्वे थांबविण्यात आली. तोपर्यंत इलेक्ट्रीक विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्यूज आॅफ करून आग पसरणार नाही याची काळजी घेतल्याने काही मिनिटांतच आग विझली. मात्र त्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. आग विझविल्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वायर कुरतडल्याने आग४रविवारी रात्री लागलेली आग याची पाहणी करण्यास सोमवारी सायंकाळी भुसावळ रेल्वे इंजिनिअरिंग विभागाचे सहायक अभियंता आनंद भगत आले होते. आग लागलेल्या ठिकाणी छताच्या खांबावर फ्यूज असलेल्या बॉक्समधील वायरिंग उंदराने कुरतडल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे भगत यांनी सांगितले. आगीच्या दोन घटनांमुळे स्थानकाची वायरिंग तपासणार असल्याचे स्थानकावरील नाशिकरोड रेल्वे इंजिनिअरिंग विभाग वरिष्ठ अभियंता प्रवीण पाटील यांनी सांगितले.