शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारनिर्मितीत लघुउद्योजकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:21 IST

देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले आहे.

नाशिक : देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले आहे.नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे मेक इन नाशिक अंतर्गत गेट वे हॉटेल अंबड येथे वेंडर डेव्हलपमेंट शिबिराचे अनंत गिते यांच्या हस्ते सोमवारी (दि.३०) उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, हरिशंकर बॅनर्जी, रामाशिष भुतडा आदी उपस्थित होते.  गिते म्हणाले, मेक इन इंडियाला बळ देण्यासाठी मेक इन नाशिकची निर्मिती करण्यात आली असून, देशातील औद्योगिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी मेक इन नाशिकची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील मोठ्या उद्योगांसोबतच लहान व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांच्या विकासावर देशाचे अर्थकारण अवलंबून आहे. या उद्योगांमधील स्पर्धेसोबतच गुणात्मक वाढ होणे अपेक्षित असून, स्पर्धात्मक वाढ ही औद्योगिक विकासाला पोषक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.  गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (बीएचइएल) ला तोट्यातून बाहेर काढण्यात सरकारला यश आले असून, अन्य उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी मेक इन इंडिया अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले. विमानसेवेवरून भाजपाला टोला नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू असून, सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित असताना या विमानसेवेसाठी लागणारा टाइमस्लॉट गुजरातसाठी वळविण्यात आला. त्यामुळे नाशिकसह अन्य विमानतळावरून उड्डाण होऊच शकले नाही. नाशिकसह अन्य कंपन्यांचा टाइमस्लॉट हा गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर या विमानतळांना देण्यात आला. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला पुन्हा घरघर लागून प्रस्तावित उडान योजनेचाच बोजवारा उडाला. यावर भाष्य करताना अनंत गिते यांनी गुजरातचे तसेच भाजपाचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या भाजपा व केंद्र सरकारला टोला लगावला.