शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांची भूमिका समाजासाठी कायमच मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान ...

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान आणून देण्याचे काम वृत्तपत्रे करतात. त्याचबरोबर समाजालादेखील मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात. वृत्तपत्रांमधून विविध क्षेत्रांतील घडामोडींविषयी अचूक व विश्वासार्ह माहिती सविस्तरपणे वाचकांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचन पूर्वीप्रमाणेच आनंददायी बनले आहे, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले आहे.----------------सकाळी समोर चहाचा कप, हातात वृत्तपत्र ही मराठी माणसांची दिवसाच्या चांगल्या सुरु वातीची कल्पना आहे. काही दिवस वृत्तपत्रे येत नव्हती. आपण सगळेच या सुखाला पारखे झालो होतो. आता हा आनंद पुन्हा मिळू  लागला आहे. बातम्या मिळण्याचे अनेक स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पण वृत्तपत्र हे जवळचे आणि विश्वासार्ह वाटते.- विनायकदादा पाटील, माजी मंत्री---------------------सध्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र पुनश्च सुरू होणे ही दिलासादायक बाब आहे. वृत्तपत्रांमुळे परिसरातील तसेच संपूर्ण विश्वातील घटना, घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळते. वृत्तपत्र सामान्य नागरिकांच्या जीवनातील माहितीचा महत्त्वाचा दुवा आहे. वृत्तपत्रांचे नियमितपणे सुरू होणे पुन्हा एकदा जगाशी जोडले जाण्यासारखे आहे.- नानासाहेब बोरस्ते, प्रभारी अध्यक्ष, सावाना-------------------वृत्तपत्र वाचनाने मिळणारी प्रत्येक माहिती अधिकृत आणि खात्रीशीर असल्याने त्याबाबतपुन्हा खात्री करून घेण्याची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा पूर्वीप्रमाणे वाचायला मिळू लागल्याने माहिती आणि ज्ञानाचा अखंड झरा पुन्हा एकदा वाहू लागला आहे. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ----------------------वृत्तपत्र वाचणे ही वर्षानुवर्षांची सवय बनलेली आहे. त्यामुळे वृत्तपत्र सुरू झाल्याने अत्यंत आनंदझाला. वृत्तपत्रे वाचताना डोळ्यांना किंवा हातांना श्रम पडत नाहीत. ती आपल्या सोयीनुसार घरातील सर्वांनाच वाचतायेत असल्याने पुन्हा एकदा वृत्तपत्र वाचनाचा मनमुराद आनंद घेत आहे. - रवींद्र ढवळे, ज्येष्ठ रंगकर्मी-------------------वृत्तपत्रे हीच सर्वाधिक विश्वासार्ह माहितीचा स्रोत असतात. त्यामुळे वृत्तपत्र सुरू होणे हा पुन्हा एकदा विश्वासार्ह माहिती हाती पडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग झाले. वृत्तपत्रातील बातमी खात्रीशीर असल्याने पुन्हा शहानिशा करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा सुरू झाल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. - सुरेश गायधनी, रंगकर्मी

टॅग्स :Nashikनाशिक