नाशिक : सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़ सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी विशेष सरकारी वकील तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले़ नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात ते बोलत होते़ जिल्हा न्यायालयातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी राज्य सरकारने जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती केलेले अॅड़ अजय मिसर व अतिरिक्तसरकारी वकील अॅड़ विनयराज तळेकर, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड़ राजेंद्र घुमरे यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे यांनी केले़ यावेळी महाराष्ट्र व गोवा बारचे सदस्य अॅड़ जयंत जायभावे, नाशिक बारचे उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, अॅड़ सुरेश निफाडे, अॅड़ हेमंत गायकवाड, अॅड़ संजय गिते, अॅड़ दीपक ढिकले, अॅड़ अपर्णा पाटील, अॅड़ सुधीर कोतवाल आदिंसह वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड़ जालिंदर ताडगे यांनी केले़ आभार अॅड़ मंगला शेजवळ यांनी मानले़ (प्रतिनिधी)
समाजस्वास्थ्यासाठी सरकारी वकिलाची भूमिका महत्त्वाची : निकम
By admin | Updated: September 27, 2016 02:05 IST