शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या मजुरीत फक्त २ रुपये वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:05 IST

१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते

ठळक मुद्देमजुरांची थट्टा : राज्य सरकारचा निर्णय आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची कमालीची भाववाढ, महागाईने गाठलेला कळस, इंधन दरवाढीत होणारी होरपळ लक्षात घेता सर्वत्र सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त केला जात असताना राज्य सरकारने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या अकुशल कामगारांच्या मजुरीत फक्त २ रुपयांनी वाढ करून मजुरांची थट्टा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोहयोच्या मजुरीत वाढ करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त २ रुपये वाढ झाल्याने आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते, तलाव, बंधारे, जमीन सपाटीकरण आदी कामे केली जात होती व गावातील मजुरांना गावातच रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना महाराष्टÑात यशस्वी ठरली होती. मजुरीच्या मोबदल्यात मजुरांना अन्नधान्य देण्याचीदेखील तरतूद यात करण्यात आली होती. ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारून संपूर्ण देशपातळीवर ती लागू केली असून, अनेक मागास राज्यांनी या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करून घेतली आहेत. परंतु महाराष्टÑातील विदर्भाचा काही भाग सोडल्यास रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. दिवसभर काम करून रोहयोतून मिळणाºया मजुरीतून दोन वेळचे पोट भरत नसल्याची वाढत चाललेली भावना व त्यामानाने मोलमजुरीत तसेच शेतीकामात मिळणारी मजुरी अधिक असल्यामुळे रोहयोच्या कामांमध्ये मजुरांअभावी कमालीची घट झाली. परिणामी घरकुल योजना, शौचालय व विहीर बांधकाम अशी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठीच मजूर कामे करू लागले आहेत. महागाईच्या तुलनेत रोहयो मजुरांना मिळणाºया मजुरीचा विचार करता राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीने सन २०१४-१५ मध्ये मजुरांना किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु सरकारने या शिफारशीकडे दुर्लक्ष करून सन २०१७-१८ मध्ये २०१ रुपये व आता २०१८-१९ मध्ये २०३ रुपये मजुरीत वाढ केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मजुरांची थट्टाच असल्याची टीका केली जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक