शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या रोहिणी कांगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:34 IST

सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांगणे यांच्या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. सिन्नर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. १२ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे असल्याने बिनविरोध निवडीची अपेक्षा होती. त्यानुसार शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत रोहिणी कांगणे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेस प्रारंभ झाला. सकाळी ११ ते दुपारी १ या निर्धारित वेळेत रोहिणी कांगणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे तहसीलदार कोताडे यांनी कांगणे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. कांगणे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांनी स्वाक्षरी केली होती.विशेष सभेस उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य भगवान पथवे, सुमन बर्डे, शोभा बर्के, संगिता पावसे, जगन्नाथ भाबड, वेणूबाई डावरे उपस्थित होते. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक विजय गडाख, रवींद्र पगार, तातू जगताप, योगिता कांदळकर गैरहजर राहिले.रोहिणी कांगणे यांची सभापतिपदी निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते उदय सांगळे यांच्याहस्ते कांगणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक खुळे, संजय सानप, अशोक डावरे, रामनाथ पावसे, पिराजी पवार उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक