शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये खडखडाट, सीडीएम भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:07 IST

बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली.

ठळक मुद्देव्यवहार ठप्प । बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांची गैरसोय

नाशिक : बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स (यूएफबीयू)च्या नेतृत्वाखाली देशव्यापी दोनदिवसीय संप पुकारला असून, या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह एकूण नऊ संघटनांनी शुक्रवारी (दि.३१) व शनिवारी (दि.१) देशव्यापी संपात सहभाग घेतल्याने जिल्हाभरातील सुमारे साडेतीनशे शाखांमधील दीडशे ते पावणेदोनशे कोटींचे व्यवहार अडकून पडले आहेत. तर एटीएममध्ये दोन दिवसांपासून रोकड जमा झालेली नसल्याने पैसै काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची निराशा होत असून सीडीएम मशीनमधून पैसे काढले गेलेले नसल्याने हातात पैसे असतानाही ग्राहकांना आपल्या खात्यावर पैसे जमा करता येऊ शकत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या दोन दिवसांच्या संपानंतर तिसºया दिवशी रविवारच्या सुटीमुळे बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांसह व्यापार उद्योग क्षेत्रालाही या संपाचा मोठा फटका बसला आहे. बँक कर्मचाºयांना १ नोव्हेंबर २०१७ पासून २० टक्के वेतनवाढ मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, स्पेशल अलाउन्स बेसिक पेमध्ये एकत्रित करावा, बँक अधिकाºयांसाठी कामाची वेळ निश्चित असावी, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, पेन्शन अपडेशन, दहा राष्ट्रीयीकृत बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी व अधिकाºयांनी पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील जवळपास ३५० शाखांमधील सुमारे २५०० कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज १०० टक्के ठप्प झाले आहे.आॅनलाइनवर मदारबँक कर्मचारी व अधिकाºयांच्या संपामुळे बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले असून, एटीएम व सीडीएममधूनही बँकेच्या खात्यावर कोणतेही व्यवहार होऊ शकत नसल्याने ग्राहकांची सर्व मदार आता आॅनलाइन व्यवहारांवर अवलंबून आहे. परंतु आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होताना दिसून येत असून, त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवरही झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र