नाशिक : चाळीस किलोमीटरपर्यंत बॉम्बगोळ्यांचा मारा करण्याची क्षमता असलेल्या आधुनिक रॉकेट लॉन्चरद्वारे अवघ्या वीस सेकंदांत ‘हर्बरा’ हे शत्रूचे लक्ष्य जवानांनी अचूकरीत्या भेदले. आणि तोफखाना सामर्थ्याचे दर्शन घडविले. निमित्त होते, नाशिक देवळाली तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या ‘सर्वत्र प्रहार’ या युद्धजन्य प्रात्यक्षिक सोहळ्याचे! भारतीय सैन्य दलाचा पाठीचा कणा म्हणून तोफखाना केंद्राकडे बघितले जाते. नाशिक येथील देवळाली परिसरात २६ हजार एकर क्षेत्रात असलेल्या भारतीय तोफखाना केंद्राच्या फिल्ड रेंजच्या मैदानावर ‘सर्वत्र प्रहार’द्वारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल सुब्रता साह, लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव उपस्थित होते. तोफखाना केंद्राचे कमांडंट मेजर जनरल जे. एस. बेदी यांनी अतिथींचे स्वागत केले. चाळीस किलोमीटरपर्यंत एकाचवेळी चाळीस अग्निबाण डागण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉन्चरने अवघ्या बारा सेकंदांत सहा अग्निबाण सोडून ‘हर्बरा’चा वेध घेतला.
रॉकेट लॉन्चरने क्षणार्धात ‘हर्बरा’ उद्ध्वस्त!
By admin | Updated: January 10, 2017 01:36 IST