लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : पाथर्डी फाट्यावरील बॉम्बे सेलच्या दुकानात कपड्यांसह रोख रकमेची जबरी लूट करणाऱ्या तिघांपैकी एक संशयित भारत किसन साळवे यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे़ त्यास न्यायालयात हजर केले असता १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, उर्वरित दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे़पाथर्डी फाट्यावरील बॉम्बे सेल या दुकानात तीन तरुण पल्सर व पॅशन या दुचाकीवरून आले़ या तिघांपैकी एकाने इमरान यास मारहाण केली तर उर्वरित दोघांनी दुकानातील कपडे व गल्ल्यातील पाच हजारांची रोकड काढून घेत पळ काढला़ या प्रकरणी इमरान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पाथर्डी परिसरात गस्त घालत असताना तीन संशयित दुचाकीवर आढळून आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी पळ काढला तर संशयित भारत साळवे यास पोलिसांनी अटक केली़
लुटीतील संशयितांना कोठडी
By admin | Updated: July 8, 2017 00:57 IST