शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सटाणा तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा, ४६ हजारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:50 PM

जायखेडा : मुल्हेर ता. बागलाण येथे पेट्रोल पंपावर हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रूपयांची रक्कम लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जायखेडा : मुल्हेर ता. बागलाण येथे पेट्रोल पंपावर हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रूपयांची रक्कम लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जायखेडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बागलाण तालुक्यातील अंतापूर - मुल्हेर रस्त्यावर एस्सार कंपनीचा उद्धवेश पेट्रोल पंप आहे. या पंपावर रविवार, दि. १७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पंपावरील व्यवस्थापक विनोद बोरसे हे आपल्या दोन कर्मचाऱ्यांकडून हिशोब घेत असतांना पल्सर या दुचाकीवरून आलेल्या आणि काळे हेल्मेट परिधान केलेल्या दोन तरूणांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये प्रवेश करून व धारदार कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रु पयांची रोकड लुटून पोबारा केला. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना देण्यात आल्यानंतर तातडीने नाकाबंदी करण्यात येवून, आरोपींचा कसून शोध घेतला गेला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी पंपावरील कर्मचाऱ्यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद दिली असून, कलम ३९२ अन्वये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायखेडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपी परिसरातील असल्याची शक्यता सपोनि गणेश गुरव यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक