शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ई-पास देण्याच्या नावाखाली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:01 IST

नाशिक : राज्यात वा परराज्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना परतीसाठी शासन दरबारी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याने त्याचा फायदा संधिसाधूंनी उचलला असून, नोंदणीचा अर्ज इंग्रजीत असल्याने अनेकांना तो भरण्यासाठी येत असलेली अडचण पाहता, सायबरचालकांनी दोनशे ते तीनशे रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, तर महसूल यंत्रणेतही काहींनी या निमित्ताने पास देण्यासाठी मोबदला घेण्याचा मार्ग अनुसरला आहे.

नाशिक : राज्यात वा परराज्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना परतीसाठी शासन दरबारी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याने त्याचा फायदा संधिसाधूंनी उचलला असून, नोंदणीचा अर्ज इंग्रजीत असल्याने अनेकांना तो भरण्यासाठी येत असलेली अडचण पाहता, सायबरचालकांनी दोनशे ते तीनशे रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, तर महसूल यंत्रणेतही काहींनी या निमित्ताने पास देण्यासाठी मोबदला घेण्याचा मार्ग अनुसरला आहे.कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात ओसरू लागताच, केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन व संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केली असून, परप्रांतीय व परराज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना व मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास अटी, शर्तींवर अनुमती देण्यात आली आहे. तथापि, यासाठी प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला आॅनलाइन नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली असून, त्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आपली व्यक्तिगत माहिती, प्रवासाचे ठिकाण, वाहन क्रमांक, चालकाचे नाव या अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. सुशिक्षित प्रवाशांकडून या संदर्भातील माहिती स्वत: आॅनलाइन भरली जात असली तरी, एकूणच संगणक निरक्षर अथवा त्याच्या हाताळणीची कोणतीच सोय नसलेल्यांना सायबर कॅफेशिवाय पर्याय राहिलेला नाही.प्रवासाचा पास मिळावा यासाठी अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत व तहसीलदार कार्यालयात दररोज चकरा मारत असून, त्यांच्या नोंदणीसाठी आॅनलाइन व्यवस्था करण्यात आलेली असतानाही नेमके असे गरजवंत हेरून त्यांना काही विशिष्ट सायबर चालकाकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तसेच विनासायास पास मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक