शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागले वाहनचाल

By admin | Updated: November 16, 2015 21:23 IST

कसर्व्हिस रस्त्याची दुरवस्था : तात्पुरत्या डागडुजीमुळे समस्येत वाढ

पाथर्डी फाटा : फाळके स्मारकासमोरील आणि गरवारे पॉइंट येथील सर्व्हिस रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक वैतागले असून, हे खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे खड्डे बुजवले जाण्याऐवजी रस्त्याची परिस्थिती अधिक खराब झाल्यामुळे या समस्येत भर पडली आहे.फाळके स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर सर्व्हिस रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथून जाताना वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय मान व पाठीचे दुखणेही वाढले असून, इच्छित स्थळी वेळेवर पोहोचणेही मुश्किल होत असल्याचे त्रस्त वाहनचालकांनी सांगितले.मुंबईकडून शहरात प्रवेश करण्यासाठी गरवारे पॉइंट येथील सर्व्हिस रस्त्याचा वाहनचालक उपयोग करतात. मात्र महामार्गावरून खाली प्रवेश करतेवेळीच वाहनचालकांचे स्वागत हे मोठे खड्डे करतात. हे खड्डे टाळण्याच्या नादात अनेक वेळा अपघातजन्य परिस्थिती उद्भवते. पाठीमागून येणारी वाहने पुढच्या वाहनांवर आदळल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पुढे आल्यावर गरवारे पॉइंट चौफुलीवरही असलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय वाहने सावकाश पुढे नेताना वाहतूक कोंडीही होते. हा त्रास टाळण्यासाठी काही वाहनचालक उड्डाणपुलावरून वाहने पुढे नेऊन आॅडी शोरूमसमोरच्या रॅम्पवरून उलटदिशेने सर्व्हिस रस्त्यावर उतरवतात जे अतिशय धोक्याचे असून, त्यामुळेही अपघातांची शक्यता वाढते. हा रॅम्प नाशिक शहर, द्वारकाकडे किंवा तसेच पुढे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा उपयोग करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांना महामार्गावर जाण्यासाठी आहे. महामार्गावरून खाली येण्यासाठी त्याची रचनाच नसताना खड्डे टाळण्यासाठी त्याचा उपयोग धोक्याचा ठरतो आहे. (वार्ताहर)