शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 22:57 IST

मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

ठळक मुद्देमनपा स्थायी समितीने दिली कामांना मंजुरी

मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.या बैठकीत शहरातील लाखो रुपयांच्या रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जुना आग्रा रोड ते जमल खटके यांच्या घरासमोरून बेकरीपर्यंत सिमेंट रस्ता, मदिना कट पिस सेंटर जवळचा सिमेंट रस्ता, जुना रिमांड रस्ता, व्हावळकर रुग्णालय ते शाहूनगरपर्यंत सिमेंट रस्ता, यासह इतर रस्ता कामाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. विषयपत्रिकेवरील सहा विषय तहकूब करण्यात आले. व्यपगत निधी परत करण्याचे दोन विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या महापालिकेच्या रुग्णालयांना औषध साठा व उपकरणे पुरवण्याची निविदा नामंजूर करण्यात आली. वारंवार त्याच मक्तेदाराला मक्ता कसा द्यायचा असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केल्याने हा विषय तहकूब करण्यात आला. तसेच स्टेशनरी पुरवठा निविदा तहकूब करण्यात आली. बैठकीला समिती सदस्य रजिया बेगम, नसरीन शेख,फैमीदा कुरेशी,मुस्तकीम डिंगणिती , सखाराम घोडके, छाया शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांवroad safetyरस्ते सुरक्षा