शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा  शहरातील साठफुटी रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST

शहरातील साठफुटी रस्त्यावर भरणाºया बाजारात धूमस्टाइल दुचाकीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. भरबाजारात बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होतात. पालिका प्रशासनाने धूमस्टाइल दुचाकींना ब्रेक लावण्यासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी रबर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी  मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

सटाणा : शहरातील साठफुटी रस्त्यावर भरणाºया बाजारात धूमस्टाइल दुचाकीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. भरबाजारात बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होतात. पालिका प्रशासनाने धूमस्टाइल दुचाकींना ब्रेक लावण्यासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी रबर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी  मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या साठफुटी रस्त्यावर रविवार ते शुक्रवार डेली भाजीपाला बाजार भरतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. दुपारी ४ वाजेनंतर या रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र वर्दळीचे ठिकाण असतानाही काही टवाळखोर भर बाजारात भरधाव दुचाकी चालवून महिलांमध्ये भीती निर्माण करतात. या गोंधळात दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. अपघात व टवाळखोरांना रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ या भाजीपाला बाजारात रबरी गतिरोधक बसवावेत अशी मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुमनबाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी हेमलता डगळे यांची भेट घेऊन केली आहे.  मुख्याधिकारी डगळे यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी यशवंत कात्रे, राम पवार, अमित पगार, दादू सोनवणे, हिरामण येवला, दिनेश सोनवणे, गणेश भामरे, रवींद्र शिंदे, अरुणा जाधव, संध्या सोनवणे, मंगला सोनवणे आदी उपस्थित होते.महिलांमध्ये असुरक्षितता; बंदोबस्ताची मागणीशहरातील साठफुटी रस्त्यावर धूमस्टाइल टवाळखोरांबरोबरच रोडरोमिओंनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. बाजारात येणाºया महिलांशी भाजीपाला घेण्याचा बहाणा करून अश्लील चाळे करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असून, महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसेच रात्री अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ सुरू असतो. तरुणींची छेड काढणे असे प्रकार राजरोज सुरू असून, बदनामी होऊ नये म्हणून अनेक महिला व तरु णी हे प्रकार पोलिसांना सांगत नसल्याचे बोलले जात आहेत. या परिसरात गस्तीसाठी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस