शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी शिक्षकाकडून रस्त्याची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:03 IST

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, पानसरे यांच्या कार्याचे वाहनधारकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांना दिलासा : जळगाव नेऊर परिसरातील गतिरोधकांवर सफेद, पिवळ्या रंगाचा वापर

जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, पानसरे यांच्या कार्याचे वाहनधारकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने, रायते येथील गतिरोधकांवर अनेक अपघात होऊन अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. जळगाव नेऊर येथील गतिरोधकावर औरंगाबाद येथील जवान, गतिरोधक न समजल्याने समोरच्या गाडीवर आदळल्याने जखमी झाला. तसेच जंगली महाराज आश्रमाजवळील गतिरोधकावर जळगाव नेऊर येथील गणेश ठोंबरे या युवकाचा अपघात होऊन अपंगत्व आले. सदर महामार्गाची डागडुजी करताना ठेकेदाराने या गतिरोधकांवर सफेद साईडपट्ट्या न मारल्याने व गतिरोधक समजत नसल्यामुळे अनेक वाहने अपघाताला बळी पडत आहेत. जळगाव नेऊर येथील गतिरोधकाजवळ विद्यालय असल्याने शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सफेद साईडपट्ट्या मारून गतिरोधकाची उंची कमी करावी, अशी मागणी येथील सोसायटीचे माजी पांडुरंग शिंदे, विजय शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या रंगाने गतिरोधक रंगवले आहेत.गतिरोधक रंगावल्याने वाहनचालकांना अंदाज येत असून, अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. संबंधित प्रशासनास कधी जाग येईल आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTeacherशिक्षक