शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे काम रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:28 IST

आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण केल्यास दळणवळणाची मोठी सोय होऊन त्यामुळे विकासाला हातभार लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देविकास खुंटला : मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण केल्यास दळणवळणाची मोठी सोय होऊन त्यामुळे विकासाला हातभार लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.महामार्गालगत असलेल्या आडगाव या परिसरात ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत, समाज कल्याण वसतिगृह, वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे राहिले आहे. मनपाच्या जुन्या विकास आराखड्यानुसार आडगावच्या रहिवासी क्षेत्रांत असलेल्या अंतर व बाह्य रिंगरोड दर्शविण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते अद्यापही कागदावरच आहेत. मुंबई-आग्रा महामागार्पासून जुना जानोरी रस्ता जात असून, या रस्त्यावरच न्यू इंग्लिश स्कूल, समाज कल्याण वसतिगृह, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाºया म्हाडाच्या वसाहतीजवळून जातो या मार्गावरच आडगावातील दशक्रियाविधीशेड आहे. पण हा रस्ता अतिशय अरुंद असून, या रस्त्यावर नेहमी विद्यार्थी व स्थानिकांची वर्दळ असते. परंतु रस्त्याअभावी म्हाडाची नागरी वसाहत व मळे परिसरातील रहिवाशांना जाताना-येताना त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी धार्मिक कार्यक्रमांसाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी व या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. महामार्गावरून जाणाºया जुन्या जानोरी रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अनेक महत्त्वाचे कार्यालये, शासनाच्या योजना या रस्त्यावर असून, नवीन नागरी वसाहतही विकसित होत आहे. मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाअभावी त्रास सहन करावा लागत आहे.- रामभाऊ जाधव,सामाजिक कार्यकर्तेरस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावेमहामार्गाकडून न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाºया मार्गावर शाळा, समाज कल्याणचे मुलांचे वसतिगृह , बहुचर्चित म्हाडाच्या सदनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प, एस.एस.सी. बोर्डाचे कार्यालय शिवाय पुढे नागरी वसाहत आहे. म्हाडाच्या शेजारी दशक्रि या विधी असे धार्मिक विधी होत असतात. तसेच म्हाडाची नागरी वसाहत व मळे परिसरातील रहिवाशांना जाताना येतांना त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी धार्मिक कार्यक्र मांसाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी व या रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका