शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नांदगाव तालुक्यात रस्त्याच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:55 IST

नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेचे, ११.८९ किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाल्याचे प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देरस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर

नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेचे, ११.८९ किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाल्याचे प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.काम पूर्ण झाल्यावर पुढील ५ वर्षे देखभाल दुरु स्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. भौगोलिकदृष्ट्या मालेगावशी जोडणारा जवळचा मार्ग असल्याने चाकरमान्यांमध्ये समाधानाची भावना पसरली आहे. लोकाभिमुख कामे मंजूर करून लोकांची होणारी गैरसोय टाळल्याबद्दल लक्ष्मण बोरसे, देवदीास पगार, अमोल पगार, संदीप पगार, नारायण पाटील, मुन्ना इनामदार, किरण गवळे, शरद सोनवणे, प्रल्हाद मंडलिक व ग्रामस्थांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले व कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.सनदशीर मार्गाने अनेकवेळा केलेले रास्ता रोको, आमरण उपोषण व सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने दाखवलेली हतबलता तसेच आपल्या कार्यकक्षेतील बाब नसल्याने पदाधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे संबंधित यंत्रणेकडून साध्या खड्डे बुजविण्याच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्याने ईर्षेने पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयापर्यंत केलेला पत्रव्यवहार व त्यास जिल्हाधिकाºयांनी दिलेला भक्कम प्रतिसाद यास अखेर यश आले आहे.