शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामाचे पितळ उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:46 IST

बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जा । ठेकेदाराच्या चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आलेले तलावाचे स्वरूप.जोरण : बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.ठेकेदाराने कोणतेही शासकीय मापदंड न पाळत रस्ता बनविला असून, रस्त्याला पाणी निचरा होण्यासाठी योग्य उतार न दिल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचून रस्ता उखडला आहे. तर साचलेल्या पाण्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप आले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी झालेला खर्च पाण्यात गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासकीय निधी वाया गेल्याने संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश घोडे यांनी एका निवेदनाद्वारे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे केली आहे.भाक्षी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मूलभूत सुविधा अंतर्गत या भागातील रस्ता करण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.या योजनेंतर्गत या परिसरात तीन महिन्यांपूर्वी रस्ता कॉँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, झालेल्या पावसात या कामाचा दर्जा उघडकीस आला आहे.आम्ही राहत असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. कोणतेही शासकीय मापदंड न पाळल्याने या रस्त्यावर पाणी साचते. यामुळे या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधित कामाची चौकशी व्हावी.- राकेश घोडे,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा