सिन्नर : येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून ३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहे. रस्ते अपघातात लाखो लोक आपले हात, पाय व शरीराचे अवयव गमावून बसतात. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वयमान हे सुमारे १८ ते ३० गटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले. रस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात शहरात, गावागावात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पोलीस हवालदार शहाजी शिंदे, राजेश काकड, समाधान बोराडे, मुख्याध्यापक संगीता आव्हाड, भाऊसाहेब कहांडळ, उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, संजय गांगुर्डे, सुजोत कुमावत, सविता दवंगे, संगीता गाडे, सरला वर्पे, विकास गिते, रवींद्र बुचकुल, नितेश दातीर, मीनाक्षी ठाकरे, वैभव केदार, विजय सावंत, ज्योती शिंदे, वृषाली खताळ, संगीता जाधव, सुरेखा भोर, शर्मिला देवरे, सरला गिते, श्रीकांत नवले, योगेश घुले आदी उपस्थित होते.हेल्मेट घाला, अपघात टाळाया उपक्रमाद्वारे पाचशे विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून सिन्नर शहरात सुरक्षित रस्ते प्रवासासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह रॅली शाळेच्या प्रांगणातून काढण्यात आली. ‘हेल्मेट घाला अपघात टाळा,’ ‘जीवन सुरक्षित, तर परिवार सुरक्षित’ असे घोषवाक्ये लिहिलेली फलके हातात घेऊन विद्यार्थ्यांनी भैरवनाथ मंदिर, खासदार पूल, बाजारवेस, लाल चौक, शिंपी गल्ली, नवापूर, गावठा या मार्गाने जात जनजागृती केली.
शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:38 IST
सिन्नर : येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून ३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅली
ठळक मुद्देरस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर