शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळदर रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:23 IST

राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

खामखेडा : राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.साक्री-नामपूर-सटाणा-खामखेडा -बेज-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक सतरा असून, या मार्गावर सटाणा ते खामखेडा या गावाच्या दरम्यान पिंपळदर या गावाजवळून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून पूर्वी नाल्याचे पाणी येत असे. पिंपळदर गावाच्या पश्चिमेस व उत्तरेस डोंगर असल्याने पावसाळ्यात या डोंगराचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत असते. तेव्हा हा रस्ता तयार करताना पावसाळ्यात पावसाचे रस्त्यावर येऊ नये. म्हणून रस्ता तयार करताना पिंपळदर गावाजवळ लाखो रुपये खर्चून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या गटारी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु देखभालीअभावी त्या गटारीत कचरा आणि माती जाऊन आज पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पिंपळदर गावाजवळून डांबरी रस्त्यावरून वाहते.पिंपळदर गावाजवळ डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडली असून, या ठिकाणी डांबरी रस्ता नाही असे वाटते. त्यामुळे रस्त्यावरील बारीक खड्डे पाणी साचून आता मोठे झाले आहेत. परंतु आता पावसाळा संपून तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र अचानक एक महिन्यापासून नाल्याला पाणी आल्यामुळे नाले वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे वाहनचालकास खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा खड्ड्यात जाऊन वाहनांचे नुकसान होत आहे. हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर चारचाकी, दुचाकी याची सतत वर्दळ असते. रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात वाहन समोरासमोर पास करताना दोन्ही वाहनधारकांना कसरत करावी लागते.रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारी माती व कचºयाने तुडुंब भरल्या असून, पाण्याला वाट मिळत नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. या रस्त्यालगतच्या गटारी साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून निधी मंजुरीची तरतूद नसल्याने संबंधित विभागाने यावर मार्ग काढावा.- संदीप पवार, सरपंच, पिंपळदर

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक