शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू

By admin | Updated: August 8, 2016 00:12 IST

बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू

दिंडोरी : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ननाशीसह परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ननाशी ते बाऱ्हे रस्त्यावर ननाशी नजीक घाटात एका अवघड वळणावर साइडपट्टी व रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी रस्ता देखील अरु ंद आहे वाहनांच्या दृष्टीने हे वळण धोकेदायक बनले आहे. पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणावर धुके येत असते. रात्रीच्य वेळी एखाद्या मोठया व अवजड वाहनाच्या चालकाला रस्त्यावरील भगदाड लक्षात आले नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. ज्या बाजूने रस्ता खचला आहे तेथे खाली अंदाजे ५० ते ७५ फूट खोल दरी आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास कळविल्यानंतर उपअभियंता शेखर मराठे अभियंता अर्जुन गोसावी यांनी भेट देत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.ननाशीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरातील सर्व पाझर तलाव, वळण बंधारे, नदी- नाले ओव्हरफ्लो झाले आहेत.तलावांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या परिसरात भात, नागली, वरई आदी पिकांच्या लावणीची कामे वेगात सुरु असतांना मुसळधार पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी लावणी केलेले भात पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. नागली, वरईची रोपे देखील पुरात वाहून गेली आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांची भात, नागली, वरई इत्यादि महत्त्वाची पिके असतात. या पिकांच्या उत्पादनावर आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ठरते. याच पिकांना पावसाचा जबर फटका बसल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदि प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)