शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साकोरेत झाड कोसळल्यामुळे रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:56 IST

कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प

कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती.रस्त्यावर झाड पडल्यामुळे कळवण व नाशिक रस्त्यावर दुतर्फा वाहने अडकून पडली. रस्ता बंद असल्यामुळे पोकलॅन्डच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात साकोरे ग्रामस्थांना यश आले.कळवण शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सकल भागांत पाणी साचले. शहरातील मेन रोड रस्त्याचे काम सध्या संथगतीने चालू आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदकाम, गटार खोदकाम केलेले आहे. तेथे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.शेमळीत वीजपुरवठा खंडितजुनी शेमळी : येथील परिसरात सायंकाळी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे गावातील श्रीराम मंदिरासमोरील वृक्ष उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांबावरील तारा तुटल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. बाहेर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. आंब्याचीही मोठ्या प्रमाणात गळती झाली. वादळी वाऱ्यामुळे सटाणा, मालेगाव रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडले. 

टॅग्स :forest departmentवनविभागroad safetyरस्ते सुरक्षा