शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

रस्ते विकासाला निधीचा अडसर

By admin | Updated: February 13, 2016 23:32 IST

निधीचा प्रश्न : पहिल्या टप्प्यात फक्त ५३ कोटींची कामे

नाशिक : महापालिका महासभेने तीन महिन्यांपूर्वी प्रशासनानेच ठेवलेल्या १९१.४३ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासकामांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असली तरी त्याच्या अंमलबजावणीला निधीचा अडसर ठरत आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून ५३ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली जात आहे. येत्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद होण्याची प्रतीक्षा नगरसेवकांना असली तरी आर्थिक परिस्थिती पाहता रस्ते विकासाच्या निधीला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. वर्षभरावर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासनाला रस्ते विकासाची कामे हाती घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत १९१.४३ कोटी रुपयांचा रस्ते विकासाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. यामध्ये रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण तसेच अस्तरीकरण आणि सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्याही कामांचा समावेश होता. महासभेनेही सदर प्रस्तावास कोणतीही चर्चा न करता मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रशासनाने नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या कामांची यादी मागविली होती. प्रशासनाची तत्परता पाहता प्रभागातील रस्ते विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात होती. परंतु पहिल्या टप्प्यात बांधकाम विभागाकडून केवळ ५३ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांच्याच निविदा काढण्यात आल्या असून, उर्वरित कामांबाबत अंदाजपत्रकातील तरतुदींकडे बोट दाखविले जात आहे. महापालिकेचे सन २०१६-१७ या वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून येत्या २५ फेबु्रवारीला स्थायी समितीवर सादर होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उत्पन्नाची जमा आणि खर्चाची बाजू पाहता परिस्थिती बिकट असल्याने आयुक्तांकडून रस्ते विकासाच्या कामांना कात्री लावली जाण्याची शक्यता असून पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता या विषयांना प्राधान्य मिळण्याचे संकेत मिळत आहेत. अंदाजपत्रकात भरीव तरतूद न झाल्यास प्रशासनासह सत्ताधारी मनसेला सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)