शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या ऋषभचे आज युक्रेनमधून उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 01:04 IST

गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त्याचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देचेहऱ्यावर आनंदाश्रू : देवरे कुटुंबीयांची प्रतीक्षा संपणार

मालेगाव कॅम्प  : गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त्याचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले. ऋषभची आई वर्षा देवरे यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.

मालेगावातील प्रगतशील शेतकरी अशोक देवरे व वर्षा देवरे यांचा चिरंजीव ऋषभ हा उच्च एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ६ वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये गेला होता. त्याच्या शिक्षणाचे अवघे तीन महिने शिल्लक होते. त्यात रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दररोज मोबाइलवरून त्याच्याशी संपर्क होत होता, तर टीव्हीवरील बातम्यांमुळे घरच्यांची काळजी वाढली होती. युक्रेनमधील ओडेशा या मोठ्या शहरात तो शिक्षण घेत होता. युद्ध सुरू झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी ओडेशा शहरावर रशियातर्फे ५ मिसाइल टाकण्यात आले होते व शहर उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली होती. सर्वत्र हाहाकार दिसून येत होता. देवरे कुटुंबीय त्याच्या संपर्कात होते, तर अनेकदा मोबाइल रेंज मिळत नव्हती. युद्ध सुरू झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ओडेशा सोडण्याचा निर्णय घेतला व ते खासगी बसने रोमानिया येथे येऊन पोहोचले. तेथे बुचारिष्ठ शहरात सध्या त्याचा मुक्काम आहे व तो दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्याने सुरक्षित असल्याचे अशोक देवरे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांसह ऋषभ बहुप्रतीक्षेनंतर मायदेशी मालेगाव येथे पोहचणार असल्याचे ऋषभचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :MalegaonमालेगांवStudentविद्यार्थी