शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी भाषेतून संस्कारक्षम पिढीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:32 IST

समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी सिंधी भाषेमधून पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सिंधी भाषेक डे समाजाचे काहीसे दुर्लक्ष होत असून, सिंधी संस्कृतीपासून भावी पिढी दुरावणार नाही, यासाठी समाजाने जागरूकता दाखवावी, असा सूर सिंधी भाषा विकास राष्ट्रीय परिषदेच्या महिला परिसंवादात उमटला.

नाशिक : समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी सिंधी भाषेमधून पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सिंधी भाषेक डे समाजाचे काहीसे दुर्लक्ष होत असून, सिंधी संस्कृतीपासून भावी पिढी दुरावणार नाही, यासाठी समाजाने जागरूकता दाखवावी, असा सूर सिंधी भाषा विकास राष्ट्रीय परिषदेच्या महिला परिसंवादात उमटला.  राष्टÑीय सिंधी भाषा विकास परिषद व नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय सिंधी भाषा विकास राष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि.२५) तपोवन रिंगरोडवरील सिंधी पंचायतीचे रामीबाई भवन सभागृहात करण्यात आले.  याप्रसंगी ‘सिंधी भाषेच्या विकासात समाजाचे योगदान’ या विषयावर पार पडलेल्या महिलांच्या परिसंवादातून सदर सूर उमटला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे समन्वयक अजित मन्याल, सिंधी पंचायत फेडरेशनचे अध्यक्ष शीतलदास बालाणी, अर्जुन कटपाल, राजेश बोधवाणी, किशन अडवाणी, शंकर जयसिंघाणी, अशोक लोकवाणी, मनोहर कारडा, दीपाचंद्राणी, दीपिका कलाणीदेवी आदी मान्यवर उपस्थित होते. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणाºया ज्येष्ठांचा सन्मान करून परिषदेला प्रारंभ करण्यात आला.  दरम्यान, राष्टÑीय परिषदेचा प्रारंभ समाजाचे जे मुख्य आधारवड आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक. वयाची ८० वर्षे पूर्ण करणाºया ज्येष्ठांचा सन्मान करून सिंधी भाषा विकास परिषदेला प्रारंभ करण्यात आल्याची घोषणा मन्याल यांनी यावेळी बोलताना केली. नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून, या पुण्यभूमीत समाजाच्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची मिळालेली संधी हा सुवर्णयोग असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक दीपा चांगराणी यांनी केले. आज रंगणार ‘...शान-ऐं-सुरहाण’ रविवारी सकाळी दहा वाजता रामीबाई भवन येथे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सिंधीबांधव सहभागी होऊन ‘सिंधी भाषेच्या विकासासाठी समाजाचे योगदान’ या विषयावर आपले मत मांडू शकतात. तसेच संध्याकाळी पाच वाजता भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात १०० मुले ‘...शान -ऐं- सुरहाण’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली आहे. ‘सिंधी भाषेच्या विकासामध्ये समाजाचे योगदान’ या विषयावर नाशिकरोड, देवळाली आदी उपनगरांमधील सिंधी सखी मंचच्या सदस्य असलेल्या महिलांनी आपले विचार मांडले. समाजात प्रथमच सिंधी संस्कृतीच्या जोपासणेसाठी पूरक अशा राष्टÑीय परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ही समाजाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.  - हेमा ज्ञानचंदाणी सिंधी समाजाच्या विकासासाठी विविध समाजसुधारक ांनी योगदान दिले असून, त्यांचे योगदान समाजाने विसरून चालणार नाही. आज भावीपिढीला सिंधी भाषेमधून संस्कृ ती व संस्काराचे धडे पालकांनी देण्याची गरज आहे.- लता टहलियानी