शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

म्हसोबा यात्रेत रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:15 IST

देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती.

नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती.  श्री म्हसोबा महाराज यात्रेला गुरूवारी सकाळी उत्साहात प्रारंभ होऊन दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रेच्या दुसºया दिवशी शुक्रवारी यात्रेला दर्शनासाठी व खरेदीसाठी नागरिक, महिलांची गर्दी झाली होती. दुपारनंतर यात्रेत मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता.  देवळालीगाव सोमवार पेठ येथील कुस्ती मैदानात सायंकाळी आमदार योगेश घोलप, पंच कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बापू कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला. प्रारंभी लहान मुलांच्या व कुस्तीपटूंच्या कुस्त्या झाल्या. मात्र त्यानंतर शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील, लष्करातील कुस्तीपटूंच्या आखाड्यात कुस्त्या झाल्या. काही कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पंच कमिटी, पक्ष, संघटना, मंडळे, संस्था व स्मृतिप्रीत्यर्थ लावलेल्या हजारो रुपये रोख बक्षिसांच्या  कुस्त्यांनी कुस्त्यांच्या दंगलीत रंगत वाढविली. यावेळी पंचकमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कुस्तीपटूंना रोख बक्षीस, ढाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंचकमिटीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कुस्तीप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.पहिल्यांदाच युवती कुस्तीपटू आखाड्यातश्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीत पहिल्यांदाच युवती कुस्तीपटू प्रज्ञा बिछय्या, शालिनी वाघ भगूर, वैष्णवी पालवे, अश्विनी गांभाळे पिंपळगाव घाडगाव, प्रियंका मांडवे चांदवड यांनी सहभागी होत आखाड्यामध्ये कुस्तीचे डावपेच दाखविले. पहिल्यांदाच कुस्तीच्या दंगलित युवती कुस्तीपटू सहभागी झाल्याने त्यांच्या लढतीप्रसंगी कुस्तीप्रेमी व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.

टॅग्स :Nashikनाशिक