शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

यात्रोत्सवात रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:22 IST

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगल राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगिरांमुळे कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

ठळक मुद्देयुवतींच्या कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी

सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगल राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगिरांमुळे कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.यंदा राज्य व परराज्यातील महिला व युवती मल्लांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती दंगलीत सहभाग घेतल्याने ही दंगल चांगलीच रंगली. हे या दंगलीचे प्रमुख आकर्षण ठरले. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फेलावण्यात आलेल्या छोटू खांडेकर (साक्र ी) व सोनू दळवी (चाळीसगाव) यांच्यातील चांदीचे कडे आणि पाच हजार रुपयांच्या अत्यंत चुरशीचा व उत्कंठावर्धक झालेला अंतिम सामना सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगला. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने खांडेकर व दळवी या कुस्तीपटूंना पारितोषिक विभागून देण्यात आले. येथील देवमामलेदार मंदिराच्या मागील बाजूकडील आरम नदीपात्रात देवमामलेदारांच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून कुस्ती दंगलीला प्रारंभ झाला.रोख स्वरूपात पारितोषिकेकुस्ती दंगलीसाठी राज्य व परराज्यातील शंभरहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. लहान वयोगटातील कुस्तीगिरांच्या कुस्तीपासून सुरु वात झाली. देवस्थानतर्फेनारळ व रोख रक्कम या विजयी कुस्तीपटूंना देण्यात आली. शंभर रु पयांपासून ते अकरा हजार रु पयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. मानाच्या कुस्त्यांसाठी दोन हजार ते पाच हजार रु पयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. सटाणा पोलीस ठाणे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही रोखीच्या बक्षिसांच्या कुस्त्या लावल्या.अवघ्या पाच वर्षांच्या हिरकणी खैरनार आणि सायली खैरनार या चिमुकलींचा रंगलेला कुस्तीचा सामना आजचे प्रमुख आकर्षण ठरला. यामध्ये हिरकणी खैरनार हिने विजय मिळविला. प्रज्ञा बिरवच्छे (इगतपुरी) हिने शुभेच्छा जाधव (लासलगाव), सर्वज्ञा पवार (मालेगाव) हिने अरु णा डंबाळे (पुणेगाव), प्रियांका मंडाले (चांदवड) हिने पूजा पवार (कंधाने) तर पल्लवी हेंबाडे (पिंपळगाव) हिने साक्षी आहेर (देवळा) हिला चारीमुंड्या चीत करीत विजय मिळविला.कुस्ती दंगलीमध्ये राज्यातील नाशिक, औरंगाबाद, येवला, मालेगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, चोपडा, पारोळा, नगर, जळगाव, नवापूर, पिंपळनेर आदींसह परराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते. कुस्ती दंगली पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती. देवस्थानने आता दंगलीत युवतींचा सहभाग वाढविला आहे. या युवतींच्या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Wrestlingकुस्तीcultureसांस्कृतिक