नाशिक : हरसूल दंगलीच्या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता राखावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत शिंदे यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात दंगल व लूटमार झालेली घरे, दुकाने यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरा आदि उपस्थित होते.व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, जनतेच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी व जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी पोलीस दलाची कुमक कायम ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले. व्यवहार सुरळीत करणे, गुन्हेगारांना पकडणे यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई
By admin | Updated: July 19, 2015 23:08 IST