शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

ज्येष्ठांसह नवमतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

By admin | Updated: February 22, 2017 01:17 IST

पंचवटी विभाग : मतदानाचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट

पंचवटी : महापालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी पंचवटी विभागातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदानाची संधी प्राप्त झालेल्या नवमतदारांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पडताच स्वत:ची छबी मोबाइलमध्ये काढून ती सोशल मीडियावर पोस्ट करून मी मतदान केले, तुम्हीदेखील मतदान करा, असा संदेश प्रसारित केला.  मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक येत होते, परंतु काहींना खोली क्रमांक सापडत नसल्याने त्यांना धावपळ करावी लागली. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर मतदान खोल्या सापडत नसल्याने मतदान केंद्राबाहेरच्या परिसरात ठिय्या मांडला होता, तर काहींनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याने पोलिसांनीच त्यांना मतदान खोल्या दाखविल्या.  मतदान केंद्रापासून काही अंतरावर उमेदवारांच्या समर्थकांनी बुथ लावलेले होते, या बुथवरही काही मतदारांची नावे सापडत नसल्याची तक्रार ज्येष्ठांनी केली, तर ज्यांची नावे सापडली त्यांनी मतदान केले. मात्र वारंवार यादी चाळूनही नावे सापडत नसल्याने अनेकांनी घरचा मार्ग पकडला. यंदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळालेल्या नव मतदारांनी मित्रांसमवेत मतदान करून मित्रांबरोबरचे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले. (वार्ताहर)